रत्नागिरी:- शहरातील प्रमोद महाजन क्रिडा संकुलजवळ बेकायदेशिरपणे गांजाचे सेवन करणार्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार 31 मे रोजी सायंकाळी 7.30 वा. सुमारास करण्यात आली.
मोईन सलीम अलज (34) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हवालदार अमोल भोसले यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, शनिवारी सायंकाळी संशयित हा बेकायदेशिरपणे गांजा सदृश्य अमली पदार्थाचे सेवन करत असाताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात औषधी द्रव्य व मन प्रभावी पदार्थ अधिनियम 1985 कायदा कलम 8 (क),27 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.