Thursday, May 14, 2026
spot_img
Home गुन्हेगारी कुवारबाव येथे भरदिवसा घरफोडी; अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास

कुवारबाव येथे भरदिवसा घरफोडी; अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास

रत्नागिरी:- शहरानजीकच्या कुवारबाव येथील सदनिका फोडून अज्ञाताने रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने आणि असा एकूण 2 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. ही घटना शनिवार 17 मे रोजी सकाळी 11.30 ते 12.45 वा. कालावधीत घडली आहे.

याप्रकरणी महेंद्र गंगाधर सावंत (56,रा.सुयोग सोसायटी कुवारबाव,रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, शनिवारी सकाळी ते कुटुंबियांसह बाहेर गेले असताना अज्ञाताने त्यांच्या सदनिकेच्या दरवाजाचे कुलुप कडीसहित उचकटून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी व लाकडी कपाटातून रोख 2 लाख रुपये आणि सोन्याचे ब्रेसलेट आणि दोन अंगठ्या असा एकूण 2 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. याप्रकरणी अज्ञाताविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 305(अ),331(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.