बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या बॅगेतून 1 लाख 70 हजारांचा ऐवज लंपास

खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल ते लोटेदरम्यान खासगी आराम बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या बॅगेतून 1 लाख 70 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास झाल्याची तक्रार येथील पोलीस स्थानकात करण्यात आली. त्यानुसार अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिसरीदेवी मदन सिंग चौधरी (रा. घाणेपुंट-गवळवाडी) यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्या कुटुंबियांसमवेत खासगी आराम बसमधून लोटे येथे आल्या. त्यानंतर घरी जाण्यासाठी एका रिक्षातून प्रवास केला. घरी गेल्यावर बॅग तपासली असता सोन्याचे दागिने लंपास झाल्याचे निदर्शनास येताच त्यांना धक्का बसला. येथील पोलीस स्थानक गाठत याबाबत तक्रार नोंदवली आहे.