Friday, May 15, 2026
spot_img
Home गुन्हेगारी रत्नागिरी न्यायालयात दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यावर गुन्हा दाखल

रत्नागिरी न्यायालयात दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यावर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- रत्नागिरी येथील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या इमारतीच्या तळमजल्यावर सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत मोठ्याने आरडाओरड करणाऱ्या एका व्यक्तीवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना काल, ३ जुलै २०२५ रोजी दुपारी १२:१५ वाजण्याच्या सुमारास घडली.

अशोक वसंत मालप (वय ५३, रा. पानगलेवाडी, पावस, ता. जि. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलीस हवालदार अभिजीत बाजीराव पाटील यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. अशोक मालप हा मद्यार्काच्या अमलाखाली सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत असल्याचे आढळल्याने त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८५ (१) (२) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११०/११७ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे न्यायालयाच्या परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.