परदेशात फिरवण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या

रत्नागिरी:- सुमारे दिड महिन्यापूर्वी ट्रॅव्हल कंपनीच्या सेमिनारमध्ये देश-विदेशात फिरण्याचे आमिष दाखवून प्रौढाची 1 लाख रुपये उकळून फसवणूक करणार्‍या एकूण 4 संशयितांना शहर पोलिसांनी अटक केली आहे.यातील दोन संशयित महिलांना शहर पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. आता त्यांच्या अन्य दोन साथिदारांनाही अटक करण्यात आली आहे.ही कामगिरी ज्या टिमने पार पाडली त्यांना पोलिस अधिक्षक मोहित कुमार गर्ग यांच्याकडून प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह देउन गौरवण्यात आले.

हसीना मोहम्मद युसूफ शेख (22,रा.घाटकोपर वेस्ट मुंबई) काजल चंद्रमणी विश्वकर्मा (23,रा.नागपूर) , अर्षद जाकिर खान उर्फ मुक्‍तार शेख (उमर) (रा.कोंडवा पूणे) आणि नितिन रामनाथ सानप (रा.मनमाड,नाशिक)अशी पोलिस अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून ते सर्व पोलिस कोठडीत आहेत.