देवरुख:- सासरच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या जावयाला अटक करून मंगळवारी देवरुख न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायाधीशांनी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
संगमेश्वर तालुक्यातील निवे बुद्रुक शिंदेवाडी येथील संतोष पाल्ये यांच्या घरातील सोन्याच्या दागिन्यांची दोन महिन्यांपूर्वी चोरी झाली होती. या सोन्यावर जावई सचिन दत्तात्रय नाखरेकर याने डल्ला मारल्याचे पोलीस तपासात सोमवारी उघड झाले आहे.









