सहकारी संस्थेत 15 लाखांचा अपहार; 4 जणांविरोधात गुन्हा दाखल 

रत्नागिरी:- सहकारी संस्थेत सुमारे 15 लाख 23 हजार 717 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी 4 जणांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपहार 1 एप्रिल 2009 ते 31 मार्च 2016 या कालावधीत फेरलेखा निरीक्षण अहवालामध्ये करण्यात आला आहे.

महेश दत्‍तात्रय सुवारे (रा. सुवारेवाडी खानू, रत्नागिरी), संदीप दत्‍ताराम घवाळी (रा.गयाळवाडी खेडशी, रत्नागिरी), सोनू धर्माजी कळंबटे आणि गणपत अनंत गोताड (दोन्ही रा.झरेवाडी हातखंबा, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात महेश दत्‍तात्रय जाधव (51, रा. खालचा फगरवठार, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

त्यानूसार, या संशयित चार जणांनी संगनमताने वाघजाई विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था,मर्यादित झरेवाडी या संस्थेच्या फेरलेखा निरीक्षण अहवालामध्ये हा अपहार केला आहे.