Wednesday, August 26, 2026
spot_img
Home खेड शौचालयाच्या टाकीत पडून खेडमधील बालकाचा मृत्यू

शौचालयाच्या टाकीत पडून खेडमधील बालकाचा मृत्यू

खेड:- क्रिकेट खेळत असताना चेंडू शौचालयाच्या टाकीत गेल्याने तो आणण्यासाठी गेलेला सात वृर्षीय बालकाचा टाकीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दाभिळ येथील लेबर कॉलनी येथे गुरुवारी (ता. २९) घडली. कार्तिक संजय गोरे (मूळ रा. हिंगोली) असे त्या मृत बालकाचे नाव आहे.

कार्तिक हा क्रिकेट खेळत असताना चेंडू हा शौचालयाच्या टाकीवर गेला. बॉल घेण्यासाठी कार्तिक हा बंदिस्त करण्यात आलेल्या टाकीच्या पत्र्याच्या बाजूने आतमध्ये गेला. त्याला पत्र्याच्या टाकीचे झाकण न समजल्याने कार्तिक टाकीतील पाण्यामध्ये पडला. त्यावेळी त्याच्यासोबत खेळत असलेल्या लहान मुलांनी आरडाओरडा केल्याने कॉलनीमधील संगीता देवकर यांनी पाहिले. कॉलनीमधील आजूबाजूच्या लोकांना बोलावले. त्यानंतर तेथील स्थानिकांनी कार्तिकला बाहेर काढून रुग्णवाहिकेने कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले; परंतु तेथे दाखल करण्यापूर्वीच कार्तिकचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.