Sunday, May 3, 2026
spot_img
Home गुन्हेगारी वरवंटा डोक्यात मारुन मुलाकडून आईच्या खुनाचा प्रयत्न

वरवंटा डोक्यात मारुन मुलाकडून आईच्या खुनाचा प्रयत्न

रत्नागिरी:- धावणवाडी (ता. लांजा) येथे आईच्या डोक्यात वरवंटा मारुन खुनाचा प्रयत्न करणाऱ्या मुलाविरुद्ध लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष गणपत दिवाळे (वय ३५, रा. धावणेवाडी, लांजा) असे खुनाचा प्रयत्न करणाऱ्या मुलाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. ८) सायंकाळी सातच्या सुमारास धावणेवाडी येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जखमी व संशयित हे नात्याने आई-मुलगा आहे. रविवारी संतोष दिवाळे याने बाजारातून आणललेली कोळंबी आईने साफ करुन झाल्यावर त्याला मसाल्याचे वाटण करण्यास सांगितले यांचा मनात राग धरु मुलाने रागाच्या भरात आईच्या डोक्यामध्ये दगडी वरवंटा मारुन तिचा शर्टाने गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी श्रेणी पोलिस उपनिरीक्षक भालचंद्र रेवणे यांनी लांजा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास लांजा पोलिस करत आहेत.