Thursday, May 14, 2026
spot_img
Home गुन्हेगारी लोटेमाळ येथे जुगार अड्ड्यावर छापा, नऊ जणांवर गुन्हा

लोटेमाळ येथे जुगार अड्ड्यावर छापा, नऊ जणांवर गुन्हा

रत्नागिरी:- खेड तालुक्यातील लोटेमाळ येथील खेडेकर किराणा मालाच्या दुकानाच्या पाठीमागे असलेल्या एका गाळ्यात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून नऊ जणांना अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी २१ मे रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या छाप्यात ६,२१० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल राम गंगाधर नागुलवार यांनी फिर्याद दिली असून, महाराष्ट्र जुगार कोड पेन अंतर्गत गुन्हा क्रमांक १५८/२०२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल सोपान धारमोडे (वय २२), रणजित भीमसेन सोरेन (वय ३४), मोहम्मद नसीम अन्सारी (वय ३८), आसिफ मोहम्मद इमाउयुद्दीन खान (वय ३८), प्रमोद नारायण गुहागरकर (वय ४९), तातू नानू पवार (वय ३८), सत्यजित संजय पवार (वय २३) आणि राजन हरी हरधारे (वय ६४) हे आठ आरोपी विनापरवाना ‘तीन पत्ती’ पत्त्याचा जुगार खेळ खेळवताना मिळून आले. तर प्रमोद जगदीश मेहता हा आरोपी जुगार खेळवण्याचे ठिकाण चालवताना आढळून आला.
या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम ६,०३० रुपये आणि १८० रुपये किमतीचे ‘५५५ इंडिगो’ नावाचे चार कॅट असे एकूण ६,२१० रुपयांचे जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.