Friday, October 2, 2026
spot_img
Home गुन्हेगारी मांडवी येथे मित्रांच्या बाचाबाचीतून एकाला मारहाण

मांडवी येथे मित्रांच्या बाचाबाचीतून एकाला मारहाण

रत्नागिरी:- शहरातील मांडवी येथे मित्रा-मित्रांमध्ये झालेला बाचाबाचीतून एकाला मारहाण झाली. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या संशयित तरुणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरु होती. रोहन ठिक व सोहम पड्यार अशी मारहाण करणाऱ्या संशयितांची नावे आहे. ही घटना गुरुवारी (ता. १) सकाळी साडेदहाच्या सुमारास मांडवी येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमी फिर्यादी स्वरुप दोरखंडे (रा. फणसोप, रत्नागिरी) हे व त्यांचे मित्र हे मांडवी येथे गेले असताना तेथे काही किरकोळ कारणाविरुन तिघांमध्ये बाचाबाची झाली त्याचे रुपान्तर वादात होऊन स्वरुप दोरखंडे याला मारहाणीत झाली. जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना सोडण्यात आले. या प्रकरणी स्वरुप दोरखंडे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यत सुरु होती.