Sunday, September 13, 2026
spot_img
Home गुन्हेगारी लग्नाचे खोटे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; संशयिताला न्यायालयीन कोठडी

लग्नाचे खोटे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; संशयिताला न्यायालयीन कोठडी

रत्नागिरी:- लग्नाचे खोटे आमिष दाखवून महिलेची फसवणूक आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

अमित मधुसूदन देसाई (रा. हातखंबा गुरववाडी, ता. जि. रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. २०१६ मध्ये संशयित अमित याने पीडित महिलेच्या पतीसोबत ओळख निर्माण केली होती. याच ओळखीचा गैरफायदा घेत त्याने पीडितेशी मैत्री वाढवली. त्यानंतर ‘मी माझ्या पत्नीला सोडणार आहे, तू देखील तुझ्या पतीला सोडून दे, आपण एकत्र राहू आणि मी तुझ्याशी लग्न करेन’ असे खोटे आश्वासन त्याने पीडिते दिले देवून विश्वास निर्माण केला होता.

लग्नाचे हेच खोटे वचन देऊन संशयिताने २०२२ मध्ये खेडशी चौसोपीवाडी येथे, २०२४ मध्ये भोके येथे आणि २०२६ मध्ये हातखंबा तारवेवाडी येथे पीडित महिलेची फसवणूक केली. तसेच वेळोवेळी तिच्याशी जवळीक साधून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक लैंगिक संबंध प्रस्थापित केले. फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने अखेर पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६९ अन्वये शनिवारी (ता. १६) मे २०२६ संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयिताला ताब्यात घेतले. सध्या या प्रकरणातील संशयित हा न्यायालयीन कोठडीत असून अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.