लक्ष्मी चौक पोस्ट ऑफिस समोर लपून बसलेला चोरट्याला अटक

रत्नागिरी:- शहरातील मुख्य पोस्ट ऑफिस समोरील टपरीमागे चोरीच्या उद्देशाने लपून बसलेल्या तरुणाला शहर पोलिसांनी अटक केली. ही कारवाई गुरुवार 17 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 1.30 वा. करण्यात आली.

अरमान समीर अल्जी (23,रा.अजिजा हाईट्स कोकणनगर, रत्नागिरी ) असे अटक करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे.

गुरुवारी रात्री शहर पोलीस गस्त घालत असताना मुख्य पोस्ट ऑफिस समोरील टपरीमागे एक तरुण लपून बसलेला त्यांना दिसून आला. पोलिसांनि त्याची चौकशी केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.त्याच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 (क) नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.अधिक तपास पोलीस हवालदार पाटील करत आहेत.