Sunday, August 9, 2026
spot_img
Home गुन्हेगारी रत्नागिरी शहरात हेरॉईनसह पकडलेल्या संशयिताला जामीन

रत्नागिरी शहरात हेरॉईनसह पकडलेल्या संशयिताला जामीन

रत्नागिरी:- अवैध अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या अद्वैत संदेश चवंडे या संशयित आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने नियमित जामीन मंजूर केला आहे.

न्यायमूर्ती मेहरोज के. पठाण यांच्या खंडपीठाने ५ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान हा आदेश दिला. २७ जून २०२५ रोजी रत्नागिरी शहर पोलिसांनी कारवाई केली. अद्वैत संदेश चवंडे याच्याकडून ८८ पाकिटांमध्ये ठेवलेले एकूण ८ ग्रॅम हेरॉईन जप्त केले होते. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्याचे कलम ८ (क) आणि २१(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती.