रत्नागिरी:- शहरातील एसटी स्टँड मधील गेटसमोर उभी केलेली दुचाकी अज्ञाताने लांबवली. ही घटना सोमवार 1 जून रोजी रोजी सकाळी 11 वा.सुमारास घडली.
याबाबत याकुब सलोमन खिश्चन (33, रा.पुष्पेंद्र सिटी खेडशी,रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, सोमवारी सकाळी त्यांनी आपल्या ताब्यातील ऍक्टिव्हा दुचाकी एसटी स्टँडमधील गेट समोर चावी लावलेल्या स्थितीत उभी केली होती. ती दुचाकी अज्ञाताने चोरुन नेली. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.









