Sunday, August 9, 2026
spot_img
Home खेड मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; क्रेटाच्या धडकेत किया कार पलटी

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; क्रेटाच्या धडकेत किया कार पलटी

खेड:- मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील भरणे गवळवाडी येथे भीषण अपघाताची घटना घडली आहे. मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या क्रेटा कारने पुढे जात असलेल्या किया कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेनंतर किया कार रस्त्याच्या बाजूला पलटी झाली. या अपघातात कर्टेल गावचे सरपंच दिनेश चव्हाण किरकोळ जखमी झाले आहेत.

अपघातानंतर किया कारमध्ये चालक अडकून पडला होता. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आणि कारमध्ये अडकलेल्या चालकाची सुखरूप सुटका केली. दरम्यान, अपघातानंतर क्रेटा कारमधील चौघांनी घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावर काही काळ वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला होता. अपघाताबाबत पुढील तपास सुरू आहे.