रत्नागिरी:- शहरातील मिरकरवाडा ते अल्ट्राटेक जेटीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला झाडाखाली जुगार खेळ चालवणाऱ्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवार 14 जुलै रोजी दुपारी 3.45 वा.सुमारास करण्यात आली.
संतोष सुरेश मयेकर (58, रा.भाटिमिऱ्या,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हवालदार अमोल भोसले यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, मंगळवारी दुपारी संशयित हा बेकायदेशिरपणे कल्याण मटका जुगाराचे साहित्य व रोख रक्कम आपल्याकडे बाळगून जुगार खेळ चालवत असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण 1160 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.









