रत्नागिरी:- रत्नागिरी रेल्वे स्थानकाजवळ मोकळया बिल्डींगमध्ये झोपलेल्या भिक्षुकाच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून त्याच्या खिशातील २ हजार रुपये लंपास करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी चोवीस तासात बेड्या घातल्या आहेत. अर्जुन भिम्माप्पा कल्लापा पवार (वय १ ९ रा.कुवारबाव,गावडेचाळ) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करुन त्याला शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
रत्नागिरी रेल्वे स्थानकानजिकच्या मोकळया बिल्डींगमध्ये संदीप प्रकाश यादव ( वय २७ रा . देवळे सरोदेवाडी ता . संगमेश्वर , सध्या रा . रेल्वे स्टेशन रत्नागिरी) हा झोपलेला होता. यावेळी अर्जुन पवार याने संदीपशी ओळख करून तो झोपलेला असताना तेथे वाद घातला. यावेळी संदीप याच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून गंभीर जखमी केले. त्यानंतर त्याचे पॅन्टचे खिशातील २ हजार रुपये काढून घेतलेले होते.
संदीप यादव याने दिलेल्या तक्रारीनंतर शहर पोलीसांनी अर्जून विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या गुन्हयाचा तपास रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखाकडून सुरु होता.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक सासने यांनी आरोपीचे शोधकामी एक खास पथक तयार केलेले होते. या पथकाने २१ जूलै रोजी रेल्वेस्टेशन परिसरात आरोपीत अर्जुन भिम्माप्पा कल्लापा पवार याचा शोध घेवून त्याला अटक केली.
अपर पोलीस अधीक्षक श्री.विशाल गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.शिरीष सासने, पोहेकॉ प्रशांत बोरकर, मिलींद कदम, सुभाष भागणे, शांताराम झोरे, राकेश बागुल, नितीन डोमणे, पोलीस नाईक अरुण चाळके, रमीज शेख यांनी केलेली आहे.