Tuesday, September 22, 2026
spot_img
Home लांजा बेपत्ता वृद्धाचा विहिरीत आढळला मृतदेह

बेपत्ता वृद्धाचा विहिरीत आढळला मृतदेह

गवाणे येथील घटना

लांजा:- तालुक्यातील गवाणे चव्हाणवाडी येथील ५५ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृतदेह शेजारच्या विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. अनंत तुकाराम चव्हाण असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते राहत्या घरातून बेपत्ता झाले होते.

​मिळालेल्या माहितीनुसार, अनंत चव्हाण (वय ५५, रा. गवाणे चव्हाणवाडी, ता. लांजा) यांचे मानसिक संतुलन बिघडलेले होते. गुरुवार, १२ मार्च रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते अचानक घरातून कोठेतरी निघून गेले होते. कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ते मिळून आले नाहीत. शुक्रवारी सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास शोध घेत असताना, वाडीतील होळीच्या मांडाजवळ असलेल्या अर्चना चव्हाण यांच्या मालकीच्या विहिरीत त्यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला.

​या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह विहिरीतून बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.