Tuesday, September 29, 2026
spot_img
Home आर्थिक बँक कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; बँका आजपासून नियमित सुरू राहणार

बँक कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; बँका आजपासून नियमित सुरू राहणार

मुंबई:- बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. देशभरातील बँकांचे कर्मचारी उद्या, 28 सप्टेंबरपासून संपावर जाणार होते. मात्र, हा तीन दिवसांचा संप स्थगित करण्यात आला आहे. संपाच्या केवळ एक दिवस आधी, आयबीए आणि बँक कामगार संघटनांची संघटना, यूएफबीयू, यांनी रात्री उशिरा एक बैठक घेतली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली आणि काही निर्णय घेण्यात आले आहेत. संप स्थगित करण्यात आला आहे.

दरम्यान, आजपासून म्हणजे 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2026 या तीन दिवसांसाठी देशव्यापी बँक संपाचे आयोजन करण्यात आले होते. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने या संपाची घोषणा केली होती. मात्र, रविवारी रात्री उशीरा बँक कर्मचारी संघटनांची बैठक झाली. या बैठकीत उद्यापासून होणारा तीन दिवसांचा संप स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, नेमका तोडगा निघाला की नाही? याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही.

सलग पाच दिवस बँका बंद राहू नये, ग्राहकांना संपाचा फटका बसू नये यासाठी रविवारी देखील बँका सुरु ठेवण्यात आल्या होत्या. सप्टेंबरमधील चौथ्या शनिवार मुळं बँका बंद होत्या. ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी रविवारी बँकाचं कामकाज सुरु ठेवण्यात आलं होतं. आजपासून सलग तीन दिवस बँका बंद राहणार असल्यानं चेक क्लिअरन्स, बँक खात्यातून रोख रक्कम काढणे आणि जमा करणे यासह इतर बँकिंग सेवा प्रभावित होऊ शकतात. बँक कर्मचारी यूनियनच्या संपाचा परिणाम सार्वजनिक बँका, जुन्या खासगी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये पाहायला मिळू शकतो.

संपावर जाणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी म्हणजे पाच दिवसांचा कामाचा आठवडा ही आहे. यूनियनच्या नेत्यांच्या माहितीनुसार मुख्य श्रम आयुक्तांसोबत झालेल्या चर्चेत सरकारकडून पाच दिवसांचा कामाचा आठवडा लागू करण्यावर ठोस आश्वासन दिलं नाही. एआयबीओसीचे महासचिव रुपम रॉय यांनी सरकार आणि व्यवस्थापनाच्या आडमुठ्या धोरणामुळं यूनियनला आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यास भाग पडलं, असं म्हटलं. काही सरकारी आणि वित्तीय संस्थांमध्ये पाच दिवसांच्या कामाच्या आठवड्याची पद्धत लागू आहे. एनसीबीईचे महासचिव एल चंद्रशेखर यांनी देखील केंद्र आणि राज्य सरकारची कार्यालये, आरबीआय, एलआयसी, जीआयसी, नाबार्ड या सारख्या इतर संस्थांमध्ये पाच दिवसांचा आठवडा सुरु आहे. शेअर बाजार, चलन बाजार आणि विदेशी चलन बाजारात देखील आठवड्यात पाच दिवस काम चालतं, असं म्हटलं.पेन्शनच्या लाभातील सुधारणा, सर्व पेन्शनधारकांना एक समान महागाई भत्ता धोरण, एनपीएसमधील कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेत परतण्याचा पर्याय उपलब्ध करुन द्याव्यात या देखील बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत. वित्त मंत्रालयानं बँक कर्मचाऱ्यांनी संपाचा मार्ग स्वीकारु नये असं म्हटलं आहे. चर्चेतून प्रश्न सोडवण्याचं आवाहन केलं आहे. पीएलआय योजना दीर्घ चर्चेनंतर या महिन्याच्या सुरुवातीलाच मागं घेतली गेली असल्याचं देखील वित्त मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.