Monday, August 17, 2026
spot_img
Home रत्नागिरी पावस भक्तनिवास येथे विष प्राशन केलेल्या नाचणे येथील वृध्दाचा मृत्यू

पावस भक्तनिवास येथे विष प्राशन केलेल्या नाचणे येथील वृध्दाचा मृत्यू

रत्नागिरी:- पावस भक्तनिवास येथील खोलीत कोणत्यातरी कारणातून विषारी औषध प्राशन केलेल्या ५८ वर्षीय नागरिकाचा उपचारादरम्यान सिव्हील हॉस्पिटल रत्नागिरी येथे मृत्यू झाला आहे. उल्हास नारायण नाटेकर (रा. साईदर्शन अपार्टमेंट, गोडावून स्टॉप, नाचणे रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना २८ जुलै रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना पावस भक्तनिवास येथे घडली.

उल्हास नाटेकर यांनी विष प्राशन केल्यानंतर त्यांच्या तोंडातून फेसाळलेली स्थिती व बेशुद्ध अवस्थेत पाहिल्यावर नातेवाईकांना माहिती मिळाली. त्यांना तातडीने स्वामी स्वरूपानंद संस्थेच्या ॲम्ब्युलन्समधून लोटलीकर हॉस्पिटल, रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने २८ जुलै रोजी सायंकाळी ७:३० वाजता डॅा. लोटलीकर यांच्या सल्ल्यानुसार त्यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील अष्टर आधार हॉस्पिटल येथे रात्री ११:३० वाजता हलवण्यात आले. तेथे ९ ऑगस्टपर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू होते.

कोल्हापुरात प्रकृतीत कोणतीही सुधारणा न झाल्यामुळे आणि ते शुद्धीवर न आल्यामुळे नातेवाईकांनी ९ ऑगस्ट रोजी डिस्चार्ज घेतला. त्यानंतर त्यांना त्याच दिवशी दुपारी १३:३० वाजता सिव्हील हॉस्पिटल, रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले. सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना १५ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता वैद्यकीय अधिकारी डॉ. पियुष यांनी उल्हास नाटेकर यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी १६ ऑगस्ट रोजी सायं. ४:२० वाजता सिव्हील हॉस्पिटल रत्नागिरी येथे खबर देण्यात आली असून, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता१९४ नुसार ३०/२०२६ प्रमाणे रीतसर नोंद करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.