Sunday, May 3, 2026
spot_img
Home गुन्हेगारी पाली माईनवाडीत ५३ हजाराची घरफोडी

पाली माईनवाडीत ५३ हजाराची घरफोडी

पाली:- येथील बाजारपेठेनजीक असणाऱ्या माईनवाडीतील बंद घरात मागील दरवाजाने प्रवेश करून चोरट्याने लोखंडी कपाटात ठेवलेली ५३ हजार ७५० रुपयाची रोकड लांबवली.

पाली पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, बाजारपेठे नजीकच्या माईनवाडी मधील दुर्गेश रामदास पाटील यांच्या घरात कोणीही नसताना चोरट्याने घराचा मागील बाजूचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि घरातील लोखंडी कपाट फोडून त्यातील २१५० इतक्या रकमेची नाणी व ५१ हजार ६०० रुपयाच्या नोटा असे एकूण ५३ हजार ७५० रुपयांची रक्कम चोरट्याने लांबविली आहे. पाटील हे आपल्या आईला सोबत घेऊन तिच्या वैद्यकीय उपचारासाठी मुंबई येथे गेलेले असतानाच चोरट्याने संधी साधली.

चोरीची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र यादव, पाली पोलीस दूरक्षेत्राचे उपनिरीक्षक मोहन कांबळे, कॉन्स्टेबल सूर्याजी पाटील याचबरोबर फॉरेन्सिक विभागाची टीम, श्वान पथक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या चोरीची फिर्याद दुर्गेश रामदास पाटील यांनी दिली असून गुन्ह्याची नोंद ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास

पाली पोलीस दूरक्षेत्राचे उपनिरीक्षक मोहन कांबळे हे करीत आहेत. मुंबई गोवा महामार्गावरील पाली बाजारपेठच्या लगत असणाऱ्या माईनवाडी या नागरी वस्तीत झालेल्या या चोरीने पाली विभागातील ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.