पऱ्याची आळी येथील अवैध मटका जुगारावर कारवाई

रत्नागिरी:- शहरातील पऱ्याची आळी येथे चालणाऱ्या अवैद्य मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह 1 हजार 579 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. प्रभाकर भिकू नाचणकर असे संशयिताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. 26) सायंकाळी सहा वाजता पऱ्याची आळी येथे बोळात निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पऱ्याची आणि येथे अवैद्य मटका जुगार चालत
असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह 1 हजार 579 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी अमित राघू पालवे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.