Monday, May 25, 2026
spot_img
Home गुन्हेगारी दोन महिला संचालकांना दोन दिवसांची पोलिस कोठडी

दोन महिला संचालकांना दोन दिवसांची पोलिस कोठडी

भरणेतील शामराव नागरी सहकारी पतसंस्थेतील अपहारप्रकरणी कारवाई

खेड:- भरणे येथील शामराव नागरी सहकारी पतसंस्थेतील कोट्यवधी रुपयांच्या अपहारप्रकरणी शुक्रवारी अटक केलेल्या दोन्ही महिला संचालकांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

तेजा राजाराम बैकर व रेवती चंद्रकांत खातू अशी अटक झालेल्या महिला संचालकांची नावे आहेत. गुंतवणूकदारांच्या वतीने सरकारी वकील मेघना नलावडे यांनी काम पाहिले. यापूर्वी अध्यक्ष दत्ताराम बैकर, उपाध्यक्ष सुधाकर शिंदे, माजी उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रिया सुतार, तसेच सदस्य सुभाष शिंदे या पाच जणांना अटक केली होती. यापैकी माजी उपाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा जामीन अर्ज मंजूर झाला असून, सुधाकर शिंदे व सुभाष शिंदे यांचे अर्ज नामंजूर झाले आहेत. त्यामुळे सध्या या प्रकरणात एकूण सहा संचालक कोठडीत आहेत. इतर काही संचालक आणि कर्मचारी यांच्यावर देखील अटकेची टांगती तलवार आहे. भरणे येथील शामराव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेतील तब्बल ४ कोटी २२ लाख ८१ हजार २१ रुपयांचा अपहार झाल्याचे वैधानिक लेखापरीक्षणात उघड झाले आहे.