दापोली:- दापोलीत भर दुपारी रस्त्यावरील एका दुचाकीस्वारांवर बिबट्याने हल्ला चढवला. या हल्ल्यात दोघे दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. दरम्यान, बिबट्याने दिवसाढवळ्या दापोली शहरात दुचाकीस्वारांवर हल्ला चढवल्याने घबराट पसरली आहे.
१५ ऑगस्ट रोजी दुपारी मौजे शिवाजीनगर (साखळोली) ते दापोली रस्त्यावर दुचाकीस्वारांवर हा हल्ला झाला. या हल्ल्यात दुचाकीस्वार वृषभ दाभोळकर (२६, रा. असोंड, ता. दापोली) आणि अमर रविंद्र लांजेकर (रा. शिवाजीनगर, साखळोली) हे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी दापोलीच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.