Wednesday, May 6, 2026
spot_img
Home दापोली दापोली येथे विहिरीत पडून वृद्धाचा मृत्यू

दापोली येथे विहिरीत पडून वृद्धाचा मृत्यू

दापोली:- तालुक्यातील करजगाव बुरुमवाडी येथे विहिरीत पडून सहदेव बाबाजी चांदवडे (७१) यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार दुपारी ३.४० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद संदेश सहदेव चांदवडे (मूळ गाव करजगाव-बुरुमवाडी, सध्या मोरेगाव नालासोपारा-मुंबई) यांनी दापोली पोलीस ठाण्यात दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदेश चांदवडे शनिवारी वाडीतील गावच्या पूजेचे विसर्जन करण्याकरता तामसतीर्थ येथे समुद्रावर गेले होते. तेथून परत घरी आले असता वडिलांची शोधाशोध केली. दरम्यान घरासमोरील विहिरीच्या पाण्यात पडलेले दिसून आले. संदेश यांनी तात्काळ ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना पाण्याबाहेर काढून दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून ते मृत घोषित केले. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.