Wednesday, May 6, 2026
spot_img
Home दापोली पर्यटकांची मिनी बस उलटून तीन कारना धडक, एक जखमी

पर्यटकांची मिनी बस उलटून तीन कारना धडक, एक जखमी

दापोली:- तालुक्यातील मुरुड येथे पुणे येथून आलेल्या पर्यटकांच्या मिनी बसला शनिवारी २५ जानेवारीला अपघात झाला. ही मिनी बस रस्त्यावर उलटून समोरून येणाऱ्या दोन ते तीन वाहनांना धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात तीन कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कारमधील प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत.

मिनी बसचा चालक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सलग तीन दिवसांची सुट्टी असल्यामुळे मुरुड परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होती. त्यामुळे अपघातानंतर मुरुड मार्गावर काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पोलीस व वाहतूक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पर्यटकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.