Sunday, May 17, 2026
spot_img
Home गुन्हेगारी दापोलीत अज्ञात चोरट्याने ७२ हजारांची रोकड लांबवली

दापोलीत अज्ञात चोरट्याने ७२ हजारांची रोकड लांबवली

दापोली:- तालुक्यातील वणौशी तर्फे पंचनदी येथील भरणेवाडी रोडवरील एक बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने कपाटातील ७२ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी प्रदिप नारायण मयेकर (वय ६८) हे सध्या विलेपार्ले (मुंबई) येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे वणौशी तर्फे पंचनदी येथे ‘दुर्वाकुर निवास’ नावाचे घर आहे. दि. २५ ऑक्टोबर २०२५ ते २५ जानेवारी २०२६ या दरम्यान त्यांचे घर बंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराच्या खिडकीचे ग्रील उचकटवून आत प्रवेश केला. चोरट्याने घरातील कपाटाची चावी मिळवून कपाट उघडले आणि त्यानंतर लॉकर कोणत्यातरी हत्याराने उचकटवून त्यातील रोकड चोरून नेली. मयेकर हे गावी आले असता हा चोरीचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.

​याप्रकरणी प्रदिप मयेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून दापोली पोलिसांनी दि. ११ फेब्रुवारी रोजी भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३०५, ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत.