Saturday, June 20, 2026
spot_img
Home गुन्हेगारी थिबा पॅलेस रोड येथे अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या तरुणावर कारवाई

थिबा पॅलेस रोड येथे अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या तरुणावर कारवाई

रत्नागिरी:- रत्नागिरीतील थिबा पॅलेस रोड परिसरात अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या एका ३० वर्षीय तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रंगेहात पकडले. या कारवाईत अंमली पदार्थ सेवनाचे साहित्य जप्त करण्यात आले असून, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १७ जून रोजी सायंकाळी ६:२० वाजण्याच्या सुमारास थिबा पॅलेस रोड येथे ही कारवाई करण्यात आली. अदनान शफीक फणसोपकर (वय ३०, रा. घर नं. २४७, कर्ला, मशिदीच्या पुढे, रत्नागिरी) हा तरुण सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थाचे सेवन करत असताना पोलिसांच्या पथकाला मिळून आला.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार वैभव गजानन मोरे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीकडून अंमली पदार्थ सेवनासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले आहे. यामध्ये प्रामुख्याने एक अर्धवट जळालेला फॉईल पेपर,
एक हिरव्या रंगाचे वापरलेले लायटर याचा समावेश होता.

याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. २००/२०२६ नुसार एन.डी.पी.एस. ॲक्ट १९८५ च्या कलम ८ (क) आणि २७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १८ जून रोजी रात्री १२:१५ वाजता हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.