थिबा पॅलेस येथे सात जणांच्या टोळीकडून तरुणाला बेदम मारहाण

रत्नागिरी:- शहरातील थिबा पॅलेस येथील एका टपरीवर सात जणांच्या टोळक्याने एका तरुणाला अडवून बेदम मारहाण केली. मारहाण केल्याची ही घटना 22 जानेवारी रोजी रात्री 8.20 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील थिबा पॅलेस येथील एका पानटपरी जवळ दादाठाकूर योगेन्द्र शर्मा (19, थिबा पॅलेस, सागर दर्शन हाईट्स, रत्नागिरी) व त्याचा मित्र यांना अडवून अक्षय माने (गवळीवाडा, रत्नागिरी) व इतर 6 जणांनी शिवीगाळ केली. त्यानंतर दगडाने व हातातील धातूच्याकड्याने मारहाण केली. त्यानंतर संशयित तेथून निघून गेले. यात दादाठाकुर शर्मा हा जखमी झाला. 
 

याबाबतची फिर्याद वडील योगेंद्र सावरमल शर्मा (52, थिबा पॅलेस, सागर दर्शन हाईट्स, रत्नागिरी) यांनी शहर पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार संशयित अक्षय माने व इतर सहा जण यांच्या विरोधात भादवी कलम 324, 143, 147, 148, 149, 341, 504 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस उप निरीक्षक महाले करत आहेत.