Sunday, May 3, 2026
spot_img
Home रत्नागिरी जोशी पाळंद येथे ५१ वर्षीय व्यावसायिकाची आत्महत्या

जोशी पाळंद येथे ५१ वर्षीय व्यावसायिकाची आत्महत्या

रत्नागिरी:- शहरातील जोशी पाळंद येथील प्रौढाने अज्ञात कारणातून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवार 31 जानेवारी रोजी सकाळी 9 वा.सुमारास उघडकीस आली. केदार श्रीकृष्ण जोशी (50,रा.जोशी पाळंद,रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या प्रौढाचे नाव आहे.

शनिवारी सकाळी घरात कोणीही नसल्याची संधी साधत केदार जोशी यांनी सिलिंग फॅनला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. केदार जोशी हे विवाहीत असून फॅब्रिकेशन व्यवसायात होते. दरम्यान,सकाळी 9 वा.सुमारास त्यांचा भाउ घरी आला असता त्याला केदार गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यांनी तातडीने याबाबत शहर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.