Tuesday, August 18, 2026
spot_img
Home गुन्हेगारी जुवेवाडी-पावस येथे मटका जुगारावर छापा

जुवेवाडी-पावस येथे मटका जुगारावर छापा

रत्नागिरी:- तालुक्यातील जुवेवाडी-पावस येथे विनापरवाना मटका जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह १ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयिताविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय विजय मयेकर (वय २८, रा.जुवेवाडी-पावस, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २४) सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास पावस-पुनस फाटा येथील रोडच्या बाजूला जुवेवाडी-पावस येथे निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित विनापरवाना मटका जुगाराचे साहित्य आपल्या ताब्यात घेतलेल्या स्थितीत सापडला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस हेड कॉन्स्टेबल विनोद कदम यांनी पुर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.