देवरुख:- आंबा घाट दरोडा प्रकरणातील मुख्य सूत्रधार सादाब गनी बलबले (रा. कोकणनगर रत्नागिरी) याला पोलिसांनी मंगळवारी रात्री रत्नागिरी येथून ताब्यात घेतले. त्याला बुधवारी देवरुख न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीशांनी ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. जनावरे वाहतूक व्यवसाय वादातून हे दरोडा प्रकरण घडल्याची बाब तपासाअंती उघड झाली आहे.
आठ दिवसांपूर्वी प्रथमेश दळवी हा बोलेरीतून म्हैस घेऊन रत्नागिरी येथून कोल्हापूरच्या दिशेने निघाला असताना आंबा घाटातील दख्खन येथे त्याला लुटण्याचा प्रकार घडला.
पोलीस यंत्रणेने काही तासातच आरोपींना जेरबंद केले. सध्या आठ जण न्यायालयीन कोठडीत आहेत. तपासादरम्यान या प्रकरणातील दोन सूत्रधार प्रसार असल्याची माहिती पुढे आली. त्यादृष्टीने पोलिसांनी सापळा रचळा. यातील सादाब गनी बलबले याला मंगळवारी रात्री अटक करण्यात आली.
घाट माथ्यावर जनावरांचा व्यवसाय करणारे कोकणात येऊन जास्त किमतीला जनावरे खरेदी करतात. याचीच खदखद सादाब याच्या मनात होती. याच रागातून हे दरोडा प्रकरणात घडल्याचे तपासात पुढे आले आहे. या प्रकरणातील एक सुत्रधार अद्याप पसार असून पोलीस शोध घेत आहेत.









