Friday, May 1, 2026
spot_img
Home चिपळूण चिपळूण येथे तरुणाची गळफास लावून आत्महत्या

चिपळूण येथे तरुणाची गळफास लावून आत्महत्या

चिपळूण:- तालुक्यातील मुंढे-सावंतवाडी येथे एका २३ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

​मिळालेल्या माहितीनुसार, दिपेश सुदेश सावंत (वय २३ वर्ष, रा. मुंढे-सावंतवाडी, ता. चिपळूण) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवार, ८ मार्च रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. दिपेशने आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये असलेल्या छताच्या पंख्याला कापडाच्या साहाय्याने गळफास लावून घेतला.

​घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रविवारी सायंकाळी ६ वाजता चिपळूण पोलीस ठाण्यात या प्रकरणाची अकस्मात मृत्यू क्रमांक ०६/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. दिपेशच्या पश्चात त्याचे वडील आणि कुटुंबीय असा परिवार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत.