Tuesday, July 21, 2026
spot_img
Home गुन्हेगारी चिपळूणमध्ये अवैध दारूचा साठा जप्त

चिपळूणमध्ये अवैध दारूचा साठा जप्त

पोफळी येथील एकावर कारवाई

चिपळूण:- अलोरे शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध दारूचा साठा जप्त केला आहे. चिपळूण तालुक्यातील पोफळी येथील एका रहिवाशाच्या घरातून १४,१२५ रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू पोलिसांनी हस्तगत केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस कर्मचारी दिलीप विठ्ठल जानकर आणि त्यांच्या पथकाने १९ जुलै रोजी सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पोफळी येथील मानकरवाडी येथे धाड टाकली. या कारवाईत शंकर गणपत मानकर (वय ४५) याच्या घराच्या बाहेरील खोलीतील बेडखाली लपवून ठेवलेला दारूचा साठा पोलिसांना आढळून आला.

या कारवाईत पोलिसांनी ‘गोल्डन व्हिस्की’ (केवळ गोवा राज्यासाठी विक्री) असे लिहिलेल्या एकूण १२५ दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. प्रत्येक बाटलीची किंमत ३३ रुपये असून, एकूण १४,१२५ रुपये किमतीचा अवैध दारूचा साठा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

आरोपी शंकर मानकर याच्याकडे या दारूचा कोणताही वैध परवाना किंवा कागदपत्रे नसल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी अलोरे शिरगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.