खेड:- तालुक्यातील घाणेखूंट येथील धापसेवाडी येथे एका ४० वर्षीय व्यक्तीने आपल्या नवीन बांधलेल्या घराच्या पडवीत लोखंडी आळाला निळ्या रंगाच्या नायलॉन रस्सीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
या घटनेत सुनिल बारकु धापसे (वय ४० वर्षे, रा. धापसेवाडी, घाणेखूंट, ता. खेड, जि. रत्नागिरी) हे मयत झाले आहेत. दिनांक २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ६:०० वाजेच्या सुमारास धाणेखूंट (धापसेवाडी) येथील नवीन घराच्या पडवीत ही घटना घडली.
या प्रकरणी उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथील वारसांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार, भा.ना.सु.सं. कलम १९४ प्रमाणे दिनांक २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११:१५ वाजता खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.









