Wednesday, May 13, 2026
spot_img
Home गुन्हेगारी गोवंश सदृश्य मांस सापडल्या प्रकरणी दोन संशयितांना अटक

गोवंश सदृश्य मांस सापडल्या प्रकरणी दोन संशयितांना अटक

रत्नागिरी:- शहरातील मारुती मंदिर परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये मंगळवारी रात्री वॉचमनच्या खोलीत गोवंश सदृश्य प्राण्याचे तीन ते चार किलो मांस सापडल्या प्रकरणातील अन्य दोन संशयितांना शहर पोलिसांनी कोकणनगर आणि उद्यमनगर येथून ताब्यात घेतले.

यात सीसीटिव्ही फूटेजमध्ये दिसून आलेला दुचाकी चालक असलेला दिपक थापा आणि राम बहादूर अशी ताब्यात घेण्यात आलेल्या अन्य दोघांची नावे आहेत. याप्रकरणात यापूर्वी अपार्टमेंटचा वॉचमन रणजीत दमाई, त्याची पत्नी आरती रणजीत दमाई (दोन्ही मुळ रा.नेपाळ सध्या रा.यशोधा अपार्टमेंट संसारे गार्डन एकता मार्ग,रत्नागिरी) आणि नासिर मुल्ला(रा.रत्नागिरी) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यातील रणजीत दमाईला पोलिसांनी अटक केली होती. त्याची न्यायालायीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

दरम्यान, बुधवारी सकाळी याप्रकरणी सकल हिंदू समाज संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांची भेट घेउन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार, पोलिस अधिक्षकांच्या सूचनेनुसार शहर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून या गुन्ह्यामधील अन्य दोघांना ताब्यात घेतले.