Tuesday, September 29, 2026
spot_img
Home गुन्हेगारी लोटे येथे तरुणाच्या अपहरणप्रकरणी गुन्हा दाखल

लोटे येथे तरुणाच्या अपहरणप्रकरणी गुन्हा दाखल

रत्नागिरी:- खेड तालुक्यातील खोपी येथील एका २३ वर्षीय तरुणाचे अज्ञात इसमाकडून अपहरणा झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम १४०(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपहरणाची ही घटना १० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास खोपी, ता. खेड येथे घडली. सतिश बाळाजी गोरे (वय २३, रा. सध्या लोटे घाणेखंट, ता. खेड, जि. रत्नागिरी) हे १० ऑगस्ट रोजी सकाळी आपल्या ताब्यातील हिरो एचएफ डिलिक्स मोटारसायकलवरून (क्र. MH 08 BB 0592) लोटे येथे निघून गेले होते.

रात्री वडिलांनी फोन केला असता त्यांचा फोन बंद येत होता. त्यानंतर १४ ऑगस्ट रोजी फिर्यादी व नातेवाईकांनी ते राहत असलेल्या व कामाच्या ठिकाणी जाऊन चौकशी केली असता, ते गेल्या ५ ते ६ दिवसांपासून कामाच्या ठिकाणी आले नसल्याचे समजले. नातेवाईकांकडे आणि लोटे परिसरात सर्वत्र शोध घेऊनही ते कुठेही आढळून आले नाहीत.
सतिश गोरे घरी परत न आल्याने, त्यांना कोणा अज्ञात इसमाने गैरपणे व अपहरणाच्या उद्देशाने नेले असल्याच्या संशयावरून फिर्यादी बाबु बाळाजी गोरे (वय ४०) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.