गणपतीपुळे येथे मटका जुगारावर पोलिसांचा छापा

रत्नागिरी:- तालुक्यातील गणपतीपुळे एसटी बसस्थानक शेडच्या पाठीमागील भिंती जवळ विनापरवाना मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. संशयितांविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. रमेश महादेव दुर्गवळी (वय ६४) असे संशयिताचे नाव आहे. हि घटना बुधवारी (ता. १८) दुपारी साडेतीनच्या सुमारास गणपतीपुळे एसटी बसस्थानकच्या पाठीमागील भिंतीजवळ निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित गणपतीपुळे येथील एसटी बसस्थानक शेडच्या पाठीमागील भिंतीजवळ विनापरवाना मटका जुगार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी संशयिताकडून साहित्यासह ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केली. या प्रकरणी महिला पोलिस शिपाई अन्वी पुसाळकर यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. .