Wednesday, May 20, 2026
spot_img
Home खेड खेडमध्ये सर्पदंशामुळे महिलेचा मृत्यू

खेडमध्ये सर्पदंशामुळे महिलेचा मृत्यू

खेड:– तालुक्यातील पोसरे बुद्रुकवाडी येथील एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेचा सर्पदंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मालती नारायण पालांडे असे मृत झालेल्या महिलेचे नाव असून, त्यांच्यावर चिपळूणमधील डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १८ ऑगस्ट २०२५ रोजी घडली. मालती पालांडे यांना सर्पदंश झाल्यानंतर त्यांना तातडीने कामथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर, त्यांची प्रकृती अधिक गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात हलवण्यात आले.

रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने १८ ऑगस्ट रोजी सकाळी ९.१५ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.