Wednesday, May 20, 2026
spot_img
Home खेड खेडमध्ये विंचू दंशाने 17 वर्षीय युवकाचा मृत्यू

खेडमध्ये विंचू दंशाने 17 वर्षीय युवकाचा मृत्यू

खेड:- तालुक्यातील तळे-कासारवाडी येथे वूंदंशाने 17 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज 13 जून रोजी पहाटेच्या सुमारास घडली. सोहम मंगेश शिर्के असे मृत युवकाचे नाव आहे. या प्रकाराने शिर्के कुटुंबियांवर दु:खा डोंगर कोसळला आहे.

इयत्ता 10वी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सोहमने इयत्ता 11वीसाठी प्रवेश अर्ज भरला होता. राहत्या घरी त्याला विंचू दंश झाल्याने उपचारासाठी तळे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. अधिक उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती गंभीर बनल्याने अधिक उपचारासाठी डेरवण रूग्णालयात हलवण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले.