Tuesday, May 26, 2026
spot_img
Home खेड खेडजवळ रेल्वे ट्रॅकवर आढळला मृतदेह

खेडजवळ रेल्वे ट्रॅकवर आढळला मृतदेह

खेड:- खेड तालुक्यातील भोस्ते बोगद्याजवळ, मैल दगड क्रमांक ०९९६ ते ०९९७ दरम्यान रेल्वे ट्रॅकवर गुरुवारी दुपारी १२.१२ वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला.
या पुरुषाचे अंदाजे वय ४२ वर्षे आहे. त्याचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर पडून असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पाहणी केली. मृताची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असून, अधिक तपास खेड पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.