Friday, May 15, 2026
spot_img
Home गुन्हेगारी खानू-पाली येथे महिलेला मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

खानू-पाली येथे महिलेला मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- आमच्या घरातील सामाईक पुजलेला देव हा त्यांच्या घरात नेलेला आहे. या बोलण्याच्या राग मनात धरुन मारहाण व दुखापत करणाऱ्या दोन संशयितांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. प्रविण प्रकाश मावळणकर, प्रसाद प्रकाश मावळणकर (दोन्ही रा. मावळणकरवाडी, खानू, पाली-रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना शुक्रवारी (ता. ६) सायंकाळी सहाच्या सुमारास मावळणकरवाडी, खानू-पाली येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनंदा सुरेश मावळणकर (वय ५७, रा. मावळणकरवाडी, खानू-पाली, रत्नागिरी) या घारी असताना संत निरंकारी महात्मा यांचे सत्संगाला बसणारे बांबर येथील श्रीराम सदाशिव ठिक हे सत्संगला बसण्याची वेळ झाल्याने तेथे जाण्याकरिता फिर्यादी यांच्या घरी आले. फिर्यादींचा दिर प्रकाश मावळणकर याने आमच्या घरातील सामाईक पुजलेला देव हा त्यांच्या घरात नेलेला आहे. तर आता मी काय करु असे बोलत असताना संशयित प्रविण व प्रसाद यांनी फिर्यादी यांचे बोलणे ऐकले या कारणावरुन फिर्यादी यांच्या घरात घुसून हातील प्लास्टीकच्या पाईपने मारहाण करुन दुखापत केले. तसेच शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. भांडण सुरु असताना सून लावण्या भांडण सोडवत असताना संशयित प्रसाद यांने लावण्याच्या मानेवर मारले. या प्रकरणी सुनंदा मावळणकर यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.