Friday, May 8, 2026
spot_img
Home रत्नागिरी कौटुंबिक वादातून वृद्धाची विषारी औषध प्राशन करत आत्महत्या

कौटुंबिक वादातून वृद्धाची विषारी औषध प्राशन करत आत्महत्या

रत्नागिरी:- तालुक्यातील गावखडी, सुतारवाडी येथे कौटुंबिक वादातून एका वृद्धाने विषारी कीटकनाशक औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना शनिवार 12 जुलै रोजी घडली आहे.

अनंत विठ्ठल मांडवकर (65) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. अनंत विठ्ठल मांडवकर हे त्यांच्या पत्नी शुभांगी अनंत मांडवकर यांच्यासोबत मूळ गावी गावखडी येथे राहत होते. १२ जुलै २०२५ रोजी पती-पत्नीमध्ये वाद झाला. या वादामुळे शुभांगी मांडवकर रागाने आपल्या मुलाकडे राहण्यासाठी गेल्या होत्या. घरी अनंत मांडवकर एकटेच असताना, त्यांनी ‘इन्पॅक्ट’ नावाचे विषारी कीटकनाशक प्राशन केले.
शेजारील लोकांना ही बाब लक्षात येताच, त्यांनी तातडीने अनंत मांडवकर यांना उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच, १३ जुलै रोजी रात्री ८.५० वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.याबाबत पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे