रत्नागिरी:- मोलमजूरी करणारा कामगार काम आटोपून जात असताना एका दुकान मालकाने लोखंडी शिगेने मारहाण केली. या प्रकरणी पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.सौ. शरयू गणेश सुर्वे (वय ४३, रा. रनपार सुर्वेवाडी, रत्नागिरी)असे संशयित महिलेचे नाव आहे.ही घटना बुधवारी (ता. ८) सायंकाळी साडेआठ ते पावणे नऊच्या सुमारास पावस स्वामी मंदिराजवळ घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी जयदास कृष्णा मांडवकर (वय ४५, रा. नालेवठार मधलीवाडी, पावस,रत्नागिरी) हे मोलमजूरी करुन पावस जुवीवाडी येथे घरी जात होते. पावस स्वामी मंदिर येथील शरयु शॉपी या दुकानाचे मालक संशयित शरयु सुर्वे यांनी कोणत्यातरी गोष्टीचा मनात राग धरुन त्यांच्या डोक्यावर कानावर,हातावर, बरगडीवर, पायावर शिगेने मारहाण करुन जखमी केले. या प्रकरणी फिर्यादी जयदास मांडवकर यांनी पुर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केले आहे.









