Wednesday, June 24, 2026
spot_img
Home गुन्हेगारी कारवांचीवाडी येथे पार्किंगमधून दुचाकी लंपास

कारवांचीवाडी येथे पार्किंगमधून दुचाकी लंपास

रत्नागिरी:- शहरानजीकच्या कारवांचीवाडी येथील गंधर्व अपार्टमेट येथून चोरट्याने दुचाकी पळविली. ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (ता. २१) सायंकाळी साडेपाच ते रात्री साडेआठच्या सुमारास गंधर्व अपार्टमेंट येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी यश सुनिल ढेकणे (वय २१, रा. गंधर्व अपार्टमेंट, कारवांचीवाडी, रत्नागिरी.) यांनी आपली दुचाकी (क्र. एमएच-०४ जेई ९६७३) ही गंधर्व अपार्टमेंट येथे पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ती पळविली. या प्रकरणी यश ढेकणे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.