एक शिवी बेतली जीवावर; जयगड मधील त्या महिलेचे आयुष्य संपले!

रत्नागिरी:- ट्रान्सपोर्ट कंपनीत काम करणारी ती महिला फोनवर कुणाशी तरी बोलत होती. संशयित आरोपी मारुती मोहिते-पाटील याने फोनवर कुणाशी बोलतेस अशी विचारणा केली. यावर महिलेने तुला काय करायचे, मी कुणाशीही बोलीन…. कुत्र्या अशी शिवी दिली. शिवी दिल्याचा राग आलेल्या मारुती पाटील याने लोखंडी पट्टीचा घाव महिलेच्या डोक्यात घातला. महिला क्षणार्धात जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. घाबरलेल्या मारुतीने दरवाजाला कडी लावत पोबारा केला. 

ट्रान्सपोर्ट कार्यालयातील कर्मचार्‍यांचे जेवण बनवण्यासाठी गेलेल्या त्या महिलेवर जीवघेणा हल्ला करून तिला ठार मारल्याप्रकरणी पोलिसांनी संशयित मारेकऱ्याच्या हातकणंगले कोल्हापूर येथून मुसक्या आवळल्या आहेत. संशयित आरोपी मारुती मोहिते-पाटील याला अटक केल्यानंतर हत्येचे कारण पुढे आले आहे. फोन वर कुणाशी बोलते अशी विचारणा मारुती याने केल्यानंतर महिलेने त्याला शिवी घातली आणि याच रागातून मारुतीने महिलेच्या डोक्यात वार केला आणि यात त्या महिलेचा मृत्यू झाला.