अवैध गावठी हातभट्टीवर पोलिसांची कारवाई

रत्नागिरी:- निवे-बुद्रुक (ता. संगमेश्वर) येथे विनापरवाना गावठी हातभट्टीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ५८० रुपयांची पाच लिटर दारू करण्यात आली. देवरूख पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसन्ना दत्ताराम सुर्वे (वय ४४, रा. निवे बुद्रुक सरोदेवाडी, ता. संगमेश्वर) असे संशयिताचे नाव आहे.

निवे-बुद्रुक सरोदेवाडी येथे पोलिसांनी केलेल्या कारवाई संशयिताकडे विनापरवाना हातभट्टीची ५८० रुपयांची पाच लिटर गावठी दारु सापडली. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल अरविंद जमदाडे यांनी देवरुख पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.