रत्नागिरी:- अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करत तिला पळवून नेल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या शाहिद शरीफ बागवान (२६ रा. गोवळकोट,चिपळूण) याला विशेष न्यायालयाने ३० हजार रुपयांच्या सशर्त जामीन मंजूर केला आहे. आरोपीच्या वतीने वकील यतिष खानोलकर आणि सुमन गावडे यांनी काम पाहिले.
कणकवली तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर तिला फूस लावत पळवून नेले होते. याबाबतची फिर्याद कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. कणकवली पोलिसांनी या फिर्यादीनुसार अज्ञात संशयित आरोपी विरोधात भादवी कलम ३६६,३६३,३७६(I),३७६(२)(N),४२७ सह बालकांचे लैंगिक अत्याचारा पासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,६ नुसार गुन्हा दाखल केला होता.यानंतर सदर मुलगी रत्नागिरी चिपळूण येथे मिळून आली होती. सदर पीडित मुलीला शाहिद बागवान याने चिपळूण येथे भाड्याची खोली घेऊन लपवून ठेवले होते. तसेच त्याने मुलीचा मोबाईल फोडून टाकला होता. सदर आरोपीला कणकवली पोलिसांनी १९ ऑक्टोबर २०२१ रोजी ताब्यात घेतले तर २० रोजी अटक केली होती. न्यायालयाने सुरुवातीला ४ दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.