Thursday, June 11, 2026
spot_img
Home गुन्हेगारी दापोली येथे अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

दापोली येथे अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

दापोली:-  दापोली तालुक्यातील जालगाव-पांगारवाडी येथे अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या एका व्यक्तीवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी की, ४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास दापोली पोलीस ठाण्याच्या पथकाने पांगारवाडी येथील घर क्रमांक ४५३ येथे छापा टाकला. यावेळी राजेंद्र अनंत घाग (वय ५१, व्यवसाय- मजुरी) हा इसम आपल्या राहत्या घरी ‘गांजा’ या अंमली पदार्थाचे सेवन करताना रंगेहात मिळून आला.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल बळीराम बालाजी चोंडे (वय ३०) यांनी दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी राजेंद्र घाग याच्याविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायदा १९८५ चे कलम ८(क) आणि २७ प्रमाणे गुन्हा रजिस्टर नंबर ३१/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.